पेणनजिक सिंलिंडर ट्रकचा स्फोट

पेणनजिक सिंलिंडर ट्रकचा स्फोट

मुंबई-गोवा हायवेवर, पेणजवळ रविवारी पहाटे दोन ट्रकच्या झालेल्या भीषण धडकेनंतर गॅस सिलिंडरने भरलेल्या ट्रकचा स्फोट होऊन अग्निकल्लोळ झाला. या अपघातात मनुष्यहानी झाली नसली तरी हायवेवरील वाहतूक सहा तास पूर्णपणे खोळंबली होती.

पहाटे पाचच्या सुमारास पेणजवळ असलेल्या हमरापूर ते गोविर्ले गावांदरम्यान एक मालवाहतूक ट्रक आणि सिलिंडरने भरलेला ट्रक यांच्यात भीषण टक्कर झाली. ही टक्कर इतकी जोरदार होती की ट्रकमधील सिलिंडरचे स्फोट होऊ लागले आणि काही वेळातच संपूर्ण ट्रकने पेट घेतला. सिलिंडरचे तुकडे विजेच्या तारांवर अडकले, तर काही रस्त्यावर पडले. स्फोटांच्या आवाजामुळे आसपासच्या गावातील लोक घाबरले. गाड्यांतील लोकही जीव मुठीत घेऊन पळाले, असे   सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *