सोन-चांदीचे दागिने खरेदी करताना KYCचे नवीन नियम

सोन-चांदीचे दागिने खरेदी करताना KYCचे नवीन नियम

यापुढे सोने-चांदी खरेदी करताना तुम्हाला KYC द्यावी लागणार आहे. बर्‍याच दिवसांपासून ही बातमी मीडियातून चर्चेत होती. मात्र, आता अर्थ मंत्रालयाने या संदर्भात स्पष्टीकरण जारी केले आहे. दागदागिने खरेदीबाबत PMLA अंतर्गत जारी करण्यात आलेल्या नव्या नियमांबाबत हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. वित्त मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार नवीन सूचना लागू झाल्यामुळे संभ्रम पसरला आहे की प्रत्येक खरेदीवर ग्राहकांना केवायसी द्यावे लागणार आहे. परंतु, अधिसूचनेनुसार, जेव्हा एखाद्या महिन्यात एका ग्राहकाने 10 लाख किंवा त्याहून अधिक किंमतीचे दागिने विकले असतील तेव्हा अशा परिस्थितीत ही अंमलबजावणी केली जाईल.

म्हणजे जर 10 लाखांपेक्षा कमी दागिने एखाद्या ग्राहकाला विकले गेले तर केवायसीचे कोणतेही कागदपत्र द्यावे लागणार नाही. वित्त मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, नव्या अधिसूचनेनुसार, 10 लाख किंवा त्याहून अधिक रकमेवरील केवायसीची अट वित्तीय कृती टास्कफोर्सच्या शिफारशींनी विचारात आणली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *