‘महाराष्ट्रभूषण’ प्रदान सोहळ्यासाठी राजभवन सज्ज

‘महाराष्ट्रभूषण’ प्रदान सोहळ्यासाठी राजभवन सज्ज

वादग्रस्त ठरलेला यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना प्रदान केला जाणार आहे. बुधवारी संध्याकाळी साडेपाच वाजता राजभवनात पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. मात्र त्याआधी या पुरस्काराला आव्हान देणाऱ्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे.

राज्य शासनाने पुरस्कार घोषित करताना निकषांचं पालन केलं नसल्याची याचिका कोर्टात दाखल झाली. त्यामुळे हायकोर्ट या याचिकेवर काय निर्णय देतं हेदेखील महत्त्वाचं ठरणार आहे.

पद्माकर कांबळे आणि राहुल पोकळे यांनी ही याचिका दाखल केली आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी पद्म पुरस्कारानं सन्मानित झालेल्या व्यक्तींना प्राधान्यक्रम दिला जातो. तसे निकष 2012 साली जाहीर केलेल्या एका अध्यादेशात मांडण्यात आले असल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *