हृतिक सोबत ‘डेट’ची ऑफर देणाऱ्या कोका कोला कंपनीविरुद्ध महिला कोर्टात

हृतिक सोबत ‘डेट’ची ऑफर देणाऱ्या कोका कोला कंपनीविरुद्ध महिला कोर्टात

एक कॉलेज विद्यार्थिनी म्हणून तिनं स्पर्धेत भाग घेतला… आणि ती विजयी झाली. कोका कोला कंपनीनं आश्वासन दिलं होतं अभिनेता हृतिक रोशनसोबत डेटवर जाण्याचं.

आपल्या प्रमोशनल कॅम्पेनमध्ये हृतिक रोशनसोबत डेटचं आश्वासन देणाऱ्या कंपनीविरोधात शिखानं कोर्टात धाव घेतली. कोका कोलानं तिला ५ लाख रुपयांची ऑफर दिलीय. मात्र अभिनेत्याला भेटण्याचं आश्वासन दिलं गेलं होतं. कंपनीनं ते पाळलं नाही, म्हणून शिखानं खोटारडी कंपनी म्हणत हा दावा केलाय.

१५ वर्षांपूर्वी जेव्हा हृतिकनं ‘कहो ना प्यार है’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. तेव्हा कॉलेजमध्ये असलेली शिखा मोंगा आता ३४ वर्षांची आहे. तिनं कोका कोला कंपनीविरोधात अडीच कोटींचा दावा केलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *