राज ठाकरे यांच्या पत्नीला कुत्र्याचा चावा

राज ठाकरे यांच्या पत्नीला कुत्र्याचा चावा

घरातील पाळीव कुत्रा चावल्यानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला यांना माहीमच्या हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या चेहऱ्यावर मोठी जखम झाल्यानं शस्त्रक्रिया करावी लागल्याचं सूत्रांकडून समजतं.

राज ठाकरे यांनी मंगळवारी दुपारी त्यांच्या ‘कृष्णकुंज’ निवासस्थानी पत्रकार परिषद बोलावली होती. त्या पत्रकार परिषदेच्या आधी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. राज यांना लगचेच याची माहिती मिळाली. मात्र, पत्रकार परिषद आधीच ठरलेली असल्यानं ती आटोपून मग ते तातडीनं रुग्णालयात गेले. तिथं त्यांनी शर्मिला यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुत्रा शर्मिला यांच्या चेहऱ्याला चावला. तो घाव इतका मोठा होता की त्यांच्या चेहऱ्याच्या हाडालाही दुखापत झाली होती. प्लास्टिक सर्जन डॉ. अनिल टिबरेवाला यांनी संध्याकाळी त्यांच्या चेहऱ्यावर शस्त्रक्रिया केली.

राज ठाकरे यांच्याकडं जेम्स व बाँड हे दोन पाळीव कुत्रे आहेत. या दोघांनाही राज आपल्या कुटुंबातील सदस्यांसारखंच मानतात. ते अधूनमधून त्यांच्याशी खेळतातही. जेम्स व बाँडच्या राहण्यासाठी राज यांनी घराच्या तळमजल्यावर स्वतंत्र व्यवस्थाही केली आहे. तसंच त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षकही ठेवला आहे. यातील बाँड हा कुत्रा शर्मिला यांना चावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *