स्पाईसजेटची धम्माल ‘हॅप्पी बर्थडे’ स्कीम!

स्पाईसजेटची धम्माल ‘हॅप्पी बर्थडे’ स्कीम!

स्पाईसजेटनं शनिवारी म्हणजेच आज आपल्या उड्डाणाचे दहा वर्ष पूर्ण केलेत… याच निमित्तानं कंपनीनं आपल्या ग्राहकांसाठी ‘हॅपी बर्थडे’ स्कीम जाहीर केलीय.

कंपनीनं या दिवसाच्या पाच तासांच्या सीमित बुकिंग वेळेत काही निवडक उड्डाणांच्या तिकीट दरांत १० टक्क्यांची सूट जाहीर केलीय.

स्पाईसजेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव कपूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘हॅपी बर्थडे टू अस’ या योजनेअंतर्गत केवळ १ जुलैपासून १५ ऑक्टोबरपर्यंतचा प्रवास ग्राहक करू शकतील. परंतु, ही योजना १६ जुलै ते २० जुलै आणि १ ऑक्टोबर ते ५ ऑक्टोबरपर्यंत लागू राहणार नाही.

यासाठी, आज म्हणजेच शनिवारी सकाळी १० वाजल्यापासून दुपारी ३ वाजेपर्यंत बुकिंग सुरू राहील. म्हणजेच, केवळ पाच तासांसाठी ही योजनेअंतर्गत बुकींग सुरू राहील. यामुळे, ग्राहकांना अत्यंत कमी दरात स्पाईसजेटसोबत उड्डाण करण्याची संधी मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *