अंमली पदार्थांचा स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणा-या व्हेनेझुएलामधून १० टन कोकेन घेऊन जात असलेले हॉकर ८०० हे विमान कोलंबियाच्या किनारपट्टीजवळ कोसळले. कोलंबियाच्या तटरक्षक दलाने कोसळलेल्या विमानाचा सांगाड, वैमानिकाचा मृतदेह आणि १.२ मेट्रीक टन कोकेन जप्त केले.
वायुदलाने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये कोलंबियाच्या आकाशातून अंमली पदार्थ घेऊन जाणारे विमान दिसत आहे. लढाऊ विमानांनी विमानाला उतरण्याचा आदेश दिला, मात्र वैमानिकाने आदेश झुगारुन विमान वेगाने पुढे नेण्यास सुरुवात केली. यावेळी इंजिनवर अतिरिक्त ताण आला आणि तांत्रिक बिघाडामुळे विमान कोलंबियाच्या किनारपट्टीजवळ कोसळले.

