मुलाच्या लग्नासाठी तुरुंगातून पॅरोलवर बाहेर आलेल्या गँगस्टर आणि माजी आमदार अरूण गवळीने, वाढीव सुट्टीसाठी अर्ज केला आहे. यावेळी त्याने आईच्या शस्त्रक्रियेचं कारण दिलं आहे.
गवळीने नागपूर विभागीय आयुक्तांकडे 30 दिवसाच्या पॅरोलची मागणी केली आहे. मात्र आयुक्तांनी याबाबत कोणताच निर्णय न घेतल्याने, गवळीच्या वकिलांनी पॅरोलसाठी नागपूर खंडपीठाकडे अर्ज केला आहे. या प्रक्रियेसाठी गवळीला 26 मे पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
5 मे रोजी बाहेर आलेल्या गवळीचा पॅरोल 21 मे रोजी संपला आहे.