जळीतकांडांचं लोण मुंबईतही, वडाळ्यात 4 बाईक जाळल्या

जळीतकांडांचं लोण मुंबईतही, वडाळ्यात 4 बाईक जाळल्या

बईतील वडाळा परिसरात काल मध्यरात्री अज्ञातांनी चार दुचाकी जाळल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

नाशिक, पुणे पाठोपाठ मुंबईत ही आता बाईक जळीतकांडांचं लोण पसरलं आहे. वडाळा-टीटी परिसरात पार्क असणाऱ्या चार बाईक अज्ञातांनी जाळल्या आहेत.

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. मात्र, अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. तसेच कोणतेही पुरावे किंवा सीसीटीव्ही फुटेज मिळू शकलेलं नसल्याने या प्रकरणातील आरोपींना पकडण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे. याप्रकरणी सध्या अधिक तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *