चोरट्यांशी झटापट; महिला ट्रेनमधून पडली!

दादरजवळ दिव्यांग महिलेला एक्स्प्रेसमधून ढकलून दिल्याची घटना ताजी असतानाच, आता तुतारी एक्स्प्रेसमध्येही चोरट्यांनी मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला असता महिला तोल जाऊन एक्स्प्रेसमधून पडली. रविवारी ही घटना घडली. तिच्यावर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सुवर्णा महाडिक (वय ५३) या तुतारी एक्स्प्रेसमधून (वैभववाडी-दादर) प्रवास करत होत्या. त्या दरवाजात उभ्या होत्या. त्याचवेळी चोरट्यानं त्यांच्या गळ्यातील सोन्याचं मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. चोरट्याशी झालेल्या झटापटीत त्यांचा तोल गेला आणि त्या एक्स्प्रेसमधून खाली पडल्या. सुवर्णा महाडिक यांच्या पतीनं प्रसंगावधान राखून एक्स्प्रेसची साखळी खेचून थांबवली. तसंच पनवेल रेल्वे पोलिसांना याबाबत माहिती दिली. महाडिक या रेल्वे रुळांवर जखमी अवस्थेत पडल्या होत्या. त्यांना जखमा झाल्या होत्या. रेल्वे पोलिसांनी त्यांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *