नॅशनल फार्मासेटीकल प्रायझिंग अथोरिटी अर्थात ‘एनपीपीए’ने या औषधांच्या किमतीत वाढ केली आहे. या औषधांमध्ये १०-२० टक्के नव्हे तर तब्बल ५० टक्क्यांनी वाढ केली आहे. ही सर्व औषधे सरकारच्या जीवनावश्यक औषधांच्या यादीत असून यांच्या किमती ठरण्याचा आधिकार सरकारच्या ‘एनपीपीए’ला आहे.
‘एनपीपीए’ने २१ औषधांच्या किंमती वाढवल्या आहेत. औषधांच्या किंमतीत ५० टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. रुग्णांची लूट होऊ नये, औषधं परवडणाऱ्या किंमतीत मिळावित यासाठी ‘एनपीपीए’ औषधांचे दर किती असावे हे निश्चित करते. त्या आधारावर औषध उत्पादक कंपन्यांना औषधांचे दर ठरवावे लागतात.
औषधांची उत्पादन किंमत, मूळ घटकद्रव्यांमध्ये वाढ झाली. त्यामुळे औषधांच्या किंमतीमध्येही वाढ व्हावी अशी मागणी औषधनिर्मिती तसेच औषध विक्रत्या कंपन्यांनी केली होती. औषध उत्पादन परवड नसल्याने हळूहळू औषधांचा तुटवडा बाजारात निर्माण होऊ लागला आहे. त्यामुळे आजारांवरील आवश्यक औषध बाजारात उपलब्ध न होण्याची समस्या निर्माण होऊ नये यासाठी दरवाढीचा निर्णय घेण्यात आला असल्याचं ‘सांगितलं
