मुंबईतील इंजिनीअरचा गुजरातमध्ये निर्घृण खून; गोणीत आढळला मृतदेह

माहीम आणि कल्याण येथे सुटकेसमध्ये मृतदेह मिळाल्याच्या घटना ताज्या असतानाच मुंबईतील आणखी एका व्यक्तीची अशाप्रकारे हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे. एअर इंडियामध्ये इंजिनीअर असलेल्या दीपक पांचाळ (५९) यांचे अपहरण करून गुजरातमध्ये त्यांची हत्या करण्यात आली. दोन महिन्यांच्या तपासानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली असून, त्यांनी पांचाळ यांचा मृतदेह गोणीत बांधून गुजरातच्या ब्राह्मणी धरणात टाकला होता.

अंधेरी येथे राहणारे अविवाहित दीपक पांचाळ २९ सप्टेंबरपासून बेपत्ता होते. पांचाळ यांच्या भावाने त्याबाबत अंधेरी पोलिस ठाण्यात तक्रार केली. बरेच दिवस शोध घेऊनही पोलिसांना पांचाळ यांचा थांगपत्ता लागत नव्हता. त्यांचे अपहरण झाल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केल्यामुळे पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरू केला. चौकशी सुरू असतानाच गुजरातच्या हलवद पोलिसांना धरणात मृतदेह असलेली गोणी सापडल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली. हा मृतदेह पांचाळ यांचाच असल्याचे स्पष्ट झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *