बॅटने पोटच्या मुलाला मारणाऱ्या राखी बालपांडेला फाशी द्या, अशी मागणी खुद्द तिचा पती तरुण बालपांडे यांनी केली आहे. पुण्यातील एका खासगी कंपनीत एचआर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करणाऱ्या राखी बालपांडेने 5 ऑगस्ट रोजी 13 वर्षांच्या अपंग चैतन्यची बॅटने मारुन हत्या केली होती.
“राखीचं आधी पण प्रेमप्रकरण होतं. तिला मोरेशी लग्न करायचं होतं. पण याची कुणकुण चैतन्यला लागली होती, त्यामुळे तो मला याबाबत सांगेल, अशी भीती राखीला होती. त्यातूनच तिने हे कृत्य केलं. नागपूरला असताना आम्ही एकत्र कुटुंबात राहायचो, मात्र राखीला हे पटत नव्हतं आणि अखेर ती पुण्याला आली. क्षुल्लक कारणावरुन ती चैतन्यला मारत असे,” असंही तरुण बालपांडे यांनी सांगितलं.
राखी बालपांडे आणि तरुण बालपांडे यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला होता. राखीचे ती राहत असलेल्या घरमालकाशी संबंध होते आणि मुलगा त्यांच्यात अडचण ठरत होता. दुसरं लग्न करण्याच्या हव्यासापोटी राखीने चैतन्य या 13 वर्षांच्या मुलाची बॅटने मारुन हत्या केली. दोघांनीही याची कबुली दिल्याचं पोलिसांनी सांगितलं.

