पुढील ५- ६ दिवसात सरकार स्थापन होईल असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. राज्यपालांकडे बहुमताचा आकडा घेऊन गेल्यावर राज्यपाल सरकार स्थापनेचं निमंत्रण देतील आणि डिसेंबरपूर्वी मजबूत सरकार बनेल असेही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पवार साहेब भेटणार असल्याची माहिती राऊत यांनी दिली. आजची काँग्रेस आणि राष्ट्रवादीची शेवटची बैठक असेल. त्यानंतर बैठका होणार नसल्याचे ते म्हणाले.
शिवसेना एनडीएतून बाहेर असून त्यांना विरोधी बाकांवर जागा दिल्याचे एनडीएनकडून स्पष्ट करण्यात आले. या पार्श्वभुमीवर शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’तू टीका करण्यात आली. संजय राऊत अद्यापही राज्यसभेत आपल्या खुर्चीवर बसले नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. खुर्ची बदलल्यामुळे संजय राऊत राज्यसभेत गेले नाहीत आणि राज्यसभेत जाणारही नाहीत अशी माहितीही समोर येत आहे.
