८० हजाराची लाच घेताना पोलीस निरीक्षक अटकेत

वाळूज एमआयडीसी परिसरात एका भंगार व्यावसायिकाला दोन लाख रूपये लाचेची मागणी केली होती त्यातील ८० हजार रुपये घेताना सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल रोडे याला लाचलूचपत अधिकाऱ्यांनी गुरुवारी रात्री उशीरा रंगेहात पकडले.

वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक राहुल रोडे यांनी एका भंगार व्यावसायिकाला दोन लाख रूपये लाचेची मागणी केली होती मात्र त्याला लाच द्यायची नव्हती. त्यामुळे त्याने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. एमआयडीसीतील कंपन्यातुन निघनारे भंगार खरेदी करणाऱ्य व्यावसायिकांकडून नेहमीच पोलीस पैसे घेतात मात्र यावेळी जास्तीची मागणी केल्याने त्याने कंटाळून तक्रार केली.

या प्रकरणात आणखी पोलीस कर्मचारी सहभागी असण्याची शक्यता आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया अप्पर अधिक्षक अनिता जमादार, उपअधिक्षक ब्रम्हदेव गावडे यांच्या मार्गदर्शनखाली अधीकार्यानी यानी सापळा रचून केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *