कृत्रिम पाऊस यशस्वी

कृत्रिम पाऊस  यशस्वी

राज्यात यंदा कमी पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. त्यामुळे राज्य सरकारने याआधीच कृत्रिम पाऊस पाडण्याची तयारी ठेवली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमेरिकेच्या दौऱ्यावर जाताना त्यांनी कृत्रिम पावसासंदर्भातील फाइलवर सही केली होती. त्यामुळे ऑगस्टमध्ये कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग करता आला. यातील औरंगाबाद येथील प्रयोग यशस्वी झाला आहे.

‘पावसाने दडी मारल्यामुळे राज्यात कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग करण्यात येत असून तो यशस्वी होत आहे. मागील वर्षी राज्य सरकारने जनावरांच्या चाराखरेदीसाठी २,७०० कोटी रुपये खर्च केले होते, त्यातुलनेत कृत्रिम पावसासाठी २७ कोटी रुपये खर्च येत असून तो फायदेशीर आहे,’ असे राज्याचे कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी सोमवारी सांगितले.

जूनमध्ये चांगला पाऊस पडला. परंतु त्यानंतर तो गायब झाला. त्यामुळे दुबार पेरण्या करूनही खरीप मोसम हातातून जाईल की काय, अशी स्थिती मराठवाड्यासह राज्यातील काही भागात आहे. परंतु कृत्रिम पावसाचा पुढील रब्बी हंगामासाठी उपयोग करता येईल. या प्रयोगासाठी खर्चही कमी येतो, असेही खडसे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *