अंतराळात चक्क भाजी उगवली

अंतराळात चक्क भाजी उगवली

अंतराळात पहिल्यांदाच भाजी उगवली आहे. 33 दिवसांनंतर उगवलेली ही भाजी अंतराळवीर खाणार आहेत.

पृथ्वीभोवती फिरणाऱ्या प्रयोगशाळेत लेट्युस लावले होते. त्यात वाढ झाली आहे. हे रेड रोंमाईन लेट्युस खाण्यास तयार आहेत. या भाज्यांची चव खाण्यायोग्य आहे का हे अंतराळवीर पाहणार आहेत.

अंतराळातली ही भाजी सायट्रिक आम्लाचा वापर करून स्वच्छ धुतली जाईल. अर्धी भाजी अंतराळवीर खाणार आहेत. तर अर्धी भाजी पृथ्वीवर आणून त्याची तपासणी केली जाणार आहे.

या प्रयोगाला व्हेज 01 या नावानं ओळखलं जात आहे. अंतराळात टोमॅटो, ब्लू बेरी आणि लेट्युस या भाज्या लावण्यात येणार असून, ताज्या भाज्यामुळे अंतराळवीरांना दिलासा मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *