ज्येष्ठ रंगकर्मी भालचंद्र पेंढारकर यांचे आज मुंबईत निधन झाले. ९४ वर्षीय पेंढारकर यांनी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे नाट्यक्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
२५ नोव्हेंबर १९२१ मध्ये जन्मलेले भालचंद्र पेंढारकर नाट्यवर्तुळात अण्णा या नावाने परिचित होते. पेंढारकर यांनी अभिनय, दिग्दर्शन, नेपथ्य, ध्वनिमुद्रण, छायाचित्रण या क्षेत्रात आपला विशेष ठसा उमटवला.
गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. अखरे सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
दुरितांचे तिमिर जावो, पंडितराज जगन्नाथ, गीता गाती ज्ञानेश्वर ही पेंढारकर यांची प्रमुख नाटके आहेत. तर ललित कलादर्श ही पेंढारकर यांची नाट्संस्था आहे.
भालचंद्र पेढांरकरांना नाट्य क्षेत्रातील मोलाच्या योगदानाबद्दल विष्णुदास भावे पुरस्कार(१९७३), बालगंधर्व पुरस्कार(१९८३), केशवराव भोसले पुरस्कार(१९९०), जागतिक मराठी परिषद(१९९६), संगीत नाटक कला अकादमी(२००४), तन्वीर पुरस्कार(२००५), चतुरंग जीवनगौरव पुरस्काराने( २००६) सन्मानित करण्यात आले होते.
अण्णांचे पार्थिव माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरात ११.३० ते १२ वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे.

