पाकिस्तानात तेजग्राम एक्स्प्रेसला भीषण आग, ६५ जणांचा मृत्यू

पाकिस्तानातील कराची रावळपिंडी तेजग्राम एक्स्प्रेसला आग लागली आहे. या आगीत ६५ जणांचा मृत्यू झाला आहे. कराची रावळपिंडी एक्स्प्रेसला आग लागल्यानंतर या अपघातात जे जखमी झाले त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची चिन्हं आहेत.मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानमध्ये गुरुवारी सकाळी म्हणजेच आज कराची रावळपिंडी तेजग्रा एक्स्प्रेसला भीषण आग लागली. या आगीचा भडका उडाला, या आगीत १६ जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींवर उपचार सुरु आहेत. लियाकतपूर या ठिकाणी आग लागली. सिलिंडरच्या स्फोटामुळे ही आग लागली आणि भडका उडाला अशी माहिती समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *