विमानात प्रवाशांसमोर प्रेमाचं जाहीर प्रदर्शन करणारे वैमानिक आणि एअर होस्टेस निलंबित

-कोलकाता विमानामध्ये हा संपूर्ण प्रकार घडला. आपली ड्युटी संपल्यानंतर पुढील सीटीवर बसून वैमानिक आणि एअर होस्टेस एकत्र बसून आपल्या प्रेमाचं जाहीर प्रदर्शन (‘पीडीए’ किंवा ‘पब्लिक डिस्प्ले ऑफ अफेक्शन’) करत होते. यासंदर्भात एका प्रवाशाने कंपनीकडे या दोघांची तक्रार केली. दोषी ठरलेला वैमानिक हा अतिरिक्त कर्मचारी म्हणून विमानातून प्रवास करत होता तर एअर होस्टेस ही ऑन ड्युटी होती.

तक्रारदार म्हणतो

तक्रार करणाऱ्या प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार ऑफ ड्युटी असणारा वैमानिक आणि ही एअर होस्टेस बाजूबाजूच्या सीटवर खेटून बसले होते. सतत त्या दोघांचे काहीतरी चाळे सुरु होते. या गोष्टीचा त्रास होऊ लागल्यानंतर त्याने यासंबंधीत तक्रार केली. नंतर त्याने थेट कंपनीकडे या दोघांबद्दल तक्रार केली. या तक्रारीनंतर दोघांची चौकशी करण्यात आल्यानंतर ते दोषी असल्याचे अढळले. या दोघांनाही कामावरुन काढून टाकण्यात आले आहे.

कंपनीने जारी केले पत्रक

“हा प्रकार चुकीचा असून आम्ही दोन्ही कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी केले आहे. अशापद्धतीचे वर्तन खपवून घेतले जाणार नाही असा इशारा आम्ही या कारवाईच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना दिला आहे”, असं ‘स्पाइस जेट’ने जारी केलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे. “ड्युटीवर असतानाच अशाप्रकारचे वर्तन करणे के कंपनीच्या प्रतिष्ठेला शोभा देणार नाही. याचा कंपनीच्या प्रतिमेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. यामुळे सहकर्मचाऱ्यांच्या कमावरही परिणाम होऊ शकतो. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही ही गंभीर बाब आहे. कामाच्या वेळी सर्व कर्मचाऱ्यांनी प्रोफेशनल पद्धतीने काम करणे अपेक्षित आहे. मात्र संबंधित प्रकरणामध्ये वैमानिक आणि एअर होस्टेसने कंपनीने नियम मोडल्याचे दिसून आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे,” असं कंपनीने स्पष्ट केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *