धनंजय मुंडे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि परळीचे नवनिर्वाचित आमदार धनंजय मुंडे यांना बुधवारी रात्री मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुंडे यांच्या पोटात अचानक दुखायला लागल्याने त्यांना मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मुंडे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त समोर आल्यानंतर सोशल मिडियावरुन चर्चांना उधाण आले. त्यानंतर मुंडे यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून ‘तब्येत उत्तम असून काळजीचे कोणतेही कारण नाही. अफवांवर विश्वास ठेऊ नये,’ असे मुंडे समर्थकांना सांगण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री मुंडे यांच्या पोटात अचानक दुखू लागल्याने त्यांना तातडीने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर तेथे काही प्राथमिक चाचण्या घेण्यात आल्या. मुंडे यांना किडनी स्टोनचा त्रास असल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. या बातमीनंतर सोशल मिडियावर अफवांना उधाण आले. त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाने ट्विटरवरुन अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन मुंडे समर्थकांना केले. “पोटदुखीच्या त्रासाच्या तपासणीसाठी आ. धनंजय मुंडे मुंबई इस्पितळात गेले होते. त्यांची तब्येत उत्तम असून काळजीचे कोणतेही कारण नाही. सर्वांना विनंती आहे की, आपण कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये. सर्वांच्या सदिच्छेबद्दल धन्यवाद,” असे ट्विट ऑफिस ऑफ डीएम म्हणजेच धनंजय मुंडेच्या कार्यालयाच्या ट्विटर हॅण्डलवरुन बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास करण्यात आले. धनंजय मुंडे यांनाही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हे ट्विट रिट्विट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *