मुंबईतल्या उच्चभ्रू इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून तरुणीची आत्महत्या

मुंबईतल्या ओशिवरा भागात काल रात्री एका उच्चभ्रू इमारतीच्या गच्चीवरून एका २२ ते २५ वर्षांच्या युवतीने उडी मारून आत्महत्या केली आहे. पर्ल पंजाबी असं या मुलीचं नाव आहे. सिनेसृष्टीत अपेक्षित यश न मिळाल्याने पर्ल पंजाबी या युवतीने आत्महत्या केल्याचं सांगितलं जातं आहे. या मुलीचे घरात आईशी सतत वाद सुरू असल्याचीही माहिती पुढे येत आहे.

 पोलिसांच्या माहितीनुसार मुलीची मानसिक स्थितीही तितकीशी चांगली नव्हती. याआधीही तिने २ वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. काल रात्री १२ वाजता घरात पुन्हा वाद झाल्यावर तिने रागाच्या भरात आत्महत्या केल्याचं सांगितलं जातं आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *