लातुरात महिन्यातून केवळ दोनदाच होणार पाणी पुरवठा

जवळपास ५ लाख लोकसंख्या असलेल्या लातूर शहराला सप्टेंबर महिन्यात फक्त दोन वेळेस पाणी पुरवठा होणार आहे. तर ०१ ऑक्टोबरपासून लातूर शहराचा नळाचा पाणी पुरवठा अनिश्चित काळासाठी बंद होणार आहे. कारण पावसाअभावी लातूर शहराला पाणी पुरवठा करणारे मांजरा धरणातील जलसाठा अटण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे आता लातूरला १ ऑक्टोबरपासून पूर्णपणे टँकरवर तसेच रेल्वेने पाणी पुरवठा करण्याची दुर्दैवी वेळ येऊन ठेपली आहे.

शिक्षणाच्या आदर्श लातूर पॅटर्नमुळे आणि दिग्गज राजकारण्यांमुळे ओळख असलेलं हे लातूर शहर आहे. मात्र १९९३ चा महाप्रलयकारी भूकंप आणि गेल्या काही वर्षांपासून सततचा दुष्काळ अशा नैसर्गिक दुष्टचक्रामुळे अधिक ओळखला जाऊ लागला. जवळपास ०५ लाख लोकसंख्या असलेल्या लातूर शहराला आता पुढील सप्टेंबर महिन्यात फक्त दोन वेळेसच पाणी पुरवठा केला जाणार आहे. तर ०१ ऑक्टोबरपासून लातूर शहराचा नळाचा पाणी पुरवठा अनिश्चित काळासाठी बंद होणार आहे.

कारण पावसाअभावी लातूरला पाणी पुरवठा करणारे मांजरा धरण कोरडं पडण्याच्या मार्गावर आहे. धरणात फक्त ०५.८४ दलघमी इतकाच मृत पाणी साठ शिल्लक आहे. त्यामुळे लातूरला पुन्हा एकदा रेल्वेने पाणी देण्याची वेळ येणार असून त्यावर लातूर महापालिकेत एका विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आल होतं. यावेळी सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षातील काँग्रेसमध्ये चांगलीच खडाजंगी झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *