गावात चोरटे शिरले आहेत, मुलं पळवून नेत आहेत, 3 हजार फासेपारध्यांची टोळी परराज्यातून जिल्ह्याच्या सीमेवर आली आहे, या आणि अशा अनेक अफवांनी सध्या सांगली- कोल्हापूरपासून उस्मानाबादपर्यंत धुमाकूळ घातला आहे. व्हॉट्सअॅपवरून तर याबाबतचे मेसेज मोठ्या प्रमाणात पसरले जात आहेत.
या अफवांमुळे अनेक गावांमध्ये लोकांनी रात्रीच्या गस्ती सुरु केल्या आहे. सोलापूरच्या कातेवाडीत चोरट्यांच्या भीतीने जमावाने एक सुमो पेटवून दिली. तर सुमोतील प्रवाशांना मारहाणही केली.
दुसरीकडे दहिटण्याच्या चंद्रभागा कोदे आपल्या मुलाचा साखरपुडा आटोपून परत येताना मालवंडीच्या गावकऱ्यांनी संशय घेऊन ट्रकवर दगडफेक केली. त्यात चंद्रभागा यांचा मृत्यू झाला.
अशा अनेक घटनांनी कायदा सुव्यवस्था लोक हातात घेऊ लागले आहेत. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेऊ नका आणि सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने करा असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
सतर्क राहा पण अफवा पसरवू नका, असंही पोलिसांनी आवाहन केलं आहे. याशिवाय काही संशयास्पद आढळल्यास जवळच्या पोलिस स्टेशनशी संपर्क साधण्याच्या सूचनाही पोलिसांनी केला आहेत.

