घटस्फोट घेण्याच्या तयारीत असलेल्या चीनमधील एका जोडप्याचा संपत्तीच्या विभाजनाचा वाद इतका टोकाला गेला की त्याची परिणती हिंसेत झाली. संतप्त झालेल्या उभयतांनी एकमेकांच्या लक्झरी गाड्यांचा चुराडा केला.
घटस्फोटाच्या वादानंतर पतीने त्याची मर्सिडीझ जाणूनबुजून पत्नीच्या पांढऱ्या बीएमडब्ल्यूवर धडकवली. यामुळे त्याच्या कारसह पत्नीच्या गाडीचाही चक्काचूर झाला. त्यामुळे प्रश्न सुटण्याऐवजी आणखी चिघळला. चीनमधल्या गुआंगझँगमध्ये ही घटना घडली.
संबंधित जोडप्याने कोर्टात घटस्फोटाचा अर्ज केला असून संपत्ती प्रश्नी तोडगा निघाला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. वाद न मिटवताच पत्नीने कोर्टातून काढता पाय घेतल्यानंतर पतीने तिचा पाठलाग केला आणि गाडी धडकवली असल्याचं वृत्त आहे.

