संजय दत्त जेलमध्ये दोन दिवस अन्नाविना

संजय दत्त  जेलमध्ये दोन दिवस अन्नाविना

येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्तला गेल्या दोन-चार दिवसांपासून अन्न-पाण्याविना दिवस ढकलत आहे. आत्याच्या निधनानंतर अंत्यसंस्कारांना जाता न आल्यामुळे तो आणखीनच शोकाकुल झाला आहे.

संजय दत्तचे वडिल सुनिल दत्त यांची बहीण राजरानी बाली यांचं नुकतंच निधन झालं. आपल्या आत्याच्या अंत्यसंस्काराला जायची परवानगी मिळाली नाही म्हणून गेल्या दोन दिवसांपासून त्यानं अन्नत्याग केला आहे. तसंच येरवडा जेलच्या आवारात असलेल्या छोट्या मंदिराबाहेर तो रडत बसल्याचीही माहिती आहे.

आपल्या आत्याच्या अंत्यसंस्काराला हजर राहण्याची संजय दत्तची इच्छा होती. मात्र त्याला परवानगी मिळाली नाही. आत्याच्या निधनानंतर त्यानं गेले दोन दिवस तो जेवला नाही. शिवाय जेलमध्ये कुणाशीही तो काहीही बोलत नसल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *