फुकट कोळंबीसाठी ग्रामस्थ पुराच्या पाण्यात

सफाळे परिसरात मुसळधार पावसामुळे मस्त्यशेतीचे बांध फुटले

कोळंबी प्रकल्पांमुळे जमिनीतील विहिरींचे पाणी मचूळ  होते; पाण्याचे स्रोत खराब होते अशा अनेकदा तक्रारी होत असतात. मात्र सफाळे परिसरातील ग्रामस्थ पूरजन्य परिस्थितीत गावामधील अशाच कोलंबी प्रकल्पाजवळ एकत्र झाल्याची माहिती पुढे आली आहे. कारण होते ते तुडुंब भरलेल्या कोळंबी प्रकल्पातून वाहणाऱ्या टायगर कोळंबी पकडण्यासाठीचे! लहान-मोठे आणि काही वयोवृद्ध मंडळीही  जाळी हातात घेऊन कंबरेभर पाण्यात उभे राहून काही तास कोळंबी पकडण्याचा प्रयत्न केला आणि काहींना घरच्या खाण्यापुरता तर काहींनी ५० ते ६० किलो कोलंबी पकडता आली.

पालघर जिल्ह्यात आठवडाअखेरीस सलग दोन-तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे सूर्या, वैतरणा नद्यांना पूर आला होता. यावेळी दुपारच्या वेळी मोठी भरती असल्याने नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली होती. वैतरणा नदीच्या काठी नवघर-घाटीम परिसरात असलेल्या अनेक कोळंबी प्रकल्पात या वाढीव पाण्याच्या पातळीचा परिणाम झाला. अनेक कोळंबी तळ्यात बांधाच्या वर २ ते ३ फूट पाणी साचल्याने अनेक तळ्यातील ओसंडून वाहू लागले वा खाडीतील पाण्यासोबत मिसळले. तसेच अनेक तास काही कोळंबी तळ्यातील पाण्यात राहिले. तळ्यांचे बांध फुटल्याने प्रकल्पातील कोळंबी आणि त्याचे बीज पाण्यासोबत वाहून जाऊ लागल्या. सफाळे जवळील नवघर— घाटीम येथे असलेल्या कोलंबी प्रकल्पातून कोलंबी बाहेर पडत असल्याची माहिती स्थानिकांना समजताच वाहणारम्य़ा पाण्यामधून कोलंबी वेचण्यासाठी कांदरवन, नवघर, घाटीम, रांजणपाडा, पेणंद आदी परिसरातील शेकडो नागरिक कोलंबी वेचायला मासळी पकडण्याचे जाळे घेऊन पुराच्या पाण्यात उतरले होते. अनेकांनी छाती पर्यंतच्या पाण्यात उभे राहून कोलंबी पकडण्याचा प्रय केला. यामध्ये सर्व वयोगातील नागरिकांचा समावेश होता.

या प्रयत्नात काही नागरिकांना ५० ते ६० किलो इतकी कोलंबी मिळाल्याने त्यांनी स्थानिक बाजारात विRीसाठी नेली. तर अनेकांना आपल्या कुटुंबाकरीता आवश्यक कोलंबी मिळाल्यानंतर मेजवानी साजरी करीत कोळंबी वर ताव मारला.

या पुरामध्ये किमान १०—१५ टन लहान मोठय़ा आकाराची कोलंबी वाहून गेल्याची माहिती पुढे आली असून पावसाच्या पाण्यावर घेतण्यात येणारम्य़ा या उत्पादनावर मोठय़ा प्रमाणात परिणाम झाला आहे. त्याचबरोबर या प्रकल्पमध्ये नदीमधून वाहणारे पाणी मिसळल्याने पॉण्ड मधील कोलंबी बीजावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही कोलंबी प्रकल्पात पुराची शक्यता पाहता हंगामापूर्वीच पॉण्ड (तळ्या) भवती जाळी पांघरून ठेवण्यात आली होती.

मुसळधार झालेल्या पावसामुळे आलेल्या पुराने जिल्ह्यात अनेकांचे नुकसान झाले व अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले मात्र सफाळा परिसरातील नवघर जवळील नागरिकांना मेजवानी करण्याची संधी देऊन गेली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *