रायगड जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने पेण तालुक्याच्या ग्रामीण भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे . पावसाबरोबरच भरतीमुळे पाणी पातळी आणखी वाढली आहे .
वाशी , कणे , बोरझे , ओढांगी या गावांना पाण्याचा वेढा पडला आहे . गावांमधील घरे पुराच्या पाण्यात असून येथील जवळपास १०० रहिवासी त्यामध्ये अडकून पडले आहेत. त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले असून बचाव कार्य सुरू आहे . आतापर्यंत २२ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आल आहे . पूरग्रस्तांची राहण्याची व्यवस्था जवळपासच्या शाळांमध्ये करण्यात आली आहे . प्रांतधिकारी प्रतिमा पुदलवाड स्वतः त्या ठिकाणी हजर आहेत .
