सर्पदंशानं विद्यार्थिनीचा मृत्यू

नांदेड जिल्ह्यातल्या कंधार तालुक्यातील चिंचोली गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत सर्पदंशानं विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय.

ऋतुजा गणेश कौशल असं या विद्यार्थिनीचं नाव असून ती वर्गात बसलेली असताना सापनं चावा घेतला. त्यानंतर शिक्षकांनी ऋतुजाला कंधारच्या ग्रामीण रुग्णालयात नेलं. मात्र सर्प दंशाची लस उपलब्ध नसल्यानं योग्य उपचार होऊ शकले नाहीत त्यामुळं मुलीचा मृत्यू झालाचा आरोप नातेवाईक आणि मुख्याध्यापकांनी केलाय.

तर मुलीला सर्पदंशाची लस देऊन, योग्य उपचार करून पाठवले असल्याचा दावा कंधार रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *