प्यारीदेवी चौधरी ही पतीच्या निधनानंतर आपल्या तीन मुलांच्या सोबत जुनी डोंबीवली येथील पार्वती निवासमध्ये राहत आहे. पतीच्या निधनानंतर तीन मुलांचा तिने सांभाळ मोठ्या कष्टाने केला. मात्र अशोक वडिलांच्या निधनानंतर वाया गेला. त्याला वाईट संगत लागली आणि त्यासंगतीमुळे त्याला दारु, गांजाची व्यसने लागलीत. तो व्यसनासाठी पैसे मागू लागला. पैसे दिले नाहीतर आई आणि लहान भावाना मारहाण करणे, पैसे चोरून घेणे, पैसे मिळाले नाही तर घरातील कोणतीही वस्तू विकुन आपले व्यसन करणे आदी प्रकारामुळे कुटुंब त्रस्त होते.
रागाच्या भरात आईने वायरने गळा आवळून खून केला. याप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपण आपल्या मुलाचा खून केला ही माहिती स्वत: मुलाच्या आईने पोलीस ठाण्यात येऊन दिली. पोलिसांनी आईला अटक केली. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

