सीएसटीच्या दिशेने जाणा-या मालगाडीच्या इंजिनात बदलापूर-अंबारनाथ या स्थानकादरम्यान बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक शनिवारी सकाळी पुन्हा विस्कळीत झाली. यामुळे अप मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
कर्जत, बदलापूर, खोपोली येथून सीएसटीच्या दिशेने जाणा-या गाड्यांची वाहतूक रखडली आहे. ऐन गर्दीच्या वेळेस ही घटना घडल्याने कामावर जाणा-या प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.
दरम्यान, मालगाडीचे इंजिन रुळावरुन हटवण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
