राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पत्नी सुवरा रुग्णालयात

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पत्नी सुवरा  रुग्णालयात

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पत्नी सुवरा यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत.

राष्ट्रपती दोन दिवसांच्या ओडिसा दौ-यावर गेले होते. या दौ-यादरम्यान ते कटक येथील नॅशनल लॉ विद्यापीठातील दीक्षान्त सोहळ्यासाठी उपस्थित राहणार होते.

त्यामुळे ओडिसाच्या दौ-यावर गेलेले राष्ट्रपती दौरा अर्धवट सोडून दिल्लीत परतले आहेत. दरम्यान, सुवरा मुखर्जी यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *