श्रीदेवी यांची हत्या झाल्याचा दावा

अभिनेत्री श्रीदेवी यांचा दुबई येथे गेल्यावर्षी झालेला मृत्यू हा अपघात नसून हत्या होती, असे खळबळजनक विधान केरळचे तुरुंग विभागाचे पोलिस महासंचालक रिशीराज सिंगयांनी केले आहे. याविषयी परिस्थीजन्य पुरावे असल्याचा दावाही सिंग यांनी केला आहे. केरळ कौमुदी या नियतकालिकामध्ये सिंग यांनी लिहिलेल्या एका सदरात हा दावा करण्यात आला आहे.

आपल्या सदरात सिंग यांनी आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ त्यांचे मित्र डॉ. उमादनाथन यांचा हवाला दिला आहे. बाथटबमध्ये असलेल्या एक फूट पाण्यात बुडून श्रीदेवी यांचा मृत्यू कुणीतरी मागून ढकलल्याखेरीज होणे शक्य नाही असे डॉ. उमादनाथन यांचे म्हणणे आहे.

रिशीराज सिंग यांचा हा दावा श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर यांनी खोडून काढला. ते म्हणाले, अशा बिनबुडाच्या कथांवर प्रतिक्रिया देण्याचीदेखील माझी इच्छा नाही. अशा कथा म्हणजे कुणाची तरी कल्पना असते. माझी चारही मुले माझ्याबरोबर आहेत आणि हीच माझी शक्ती आहे, याकडे बोनी कपूर यांनी लक्ष वेधले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *