गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना आणखी एक दिलासा मिळण्याची चिन्ह आहेत. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या खासगी वाहनांना टोलमाफी मिळण्याची शक्यता आहे.
परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बैठकीत यावर सकारात्मक चर्चा झाली. टोलमाफीबाबत अधिकृत घोषणा झालेली नसली तरी यावर लवकरच शिक्कामोर्तब होईल, अशी अपेक्षा आहे.
वाहनांना 13 ते 16 सप्टेंबर दरम्यान ही टोलमाफी असेल. शिवाय गणेशभक्तांसाठी 2350 एसटी बसेसही सोडल्या जाणार आहेत.
दरम्यान गणेशोत्सवाच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत ट्रक, कंटेनर अशा अवजड वाहनांची वाहतूकही बंद ठेवली जाणार आहे.

