‘मातोश्री’वर चाकू, ब्लेड घेऊन जाणाऱ्याला पकडलं

‘मातोश्री’वर चाकू, ब्लेड घेऊन जाणाऱ्याला पकडलं

शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी काँग्रेसचे नगरसेवक अनिल पाटणकर यांच्यासोबत ‘मातोश्री’वर आलेल्या कार्यकर्त्यांच्या ‘भाऊ’गर्दीतील एका शस्त्रधारी व्यक्तीला पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून चाकू आणि ब्लेड जप्त करण्यात आली आहे.

काँग्रेसचे नगरसेवक पाटणकर हे कार्यकर्ते आणि समर्थकांसह आज शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी ‘मातोश्री’वर आले होते. यात एक संशयित व्यक्ती पोलिसांना दिसून आला. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली. त्यावेळी त्याच्याकडे चाकू आणि ब्लेड सापडली. खेरवाडी पोलिसांनी त्याला अधिक चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. राममिलन शर्मा असे त्याचे नाव आहे. व्यवसायाने न्हावी असल्याने चाकू आणि ब्लेड बाळगतो, असा दावा राममिलन याने केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *