भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर आज (शुक्रवार) सकाळपासून जोरदार गोळीबार सुरू आहे, अशी माहिती लष्कराच्या प्रवक्त्यांनी दिली.
लष्कराचे प्रवक्ते कर्नल मनिष मेहता यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने सीमेवर असलेल्या काश्मीरमधील पूँछ जिल्ह्यामध्ये पहाटे साडेतीनच्या सुमारास जोरदार गोळीबार सुरू केला. आपल्या जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. सीमेवर अद्यापही दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरू आहे.
