राधे माँ देशाबाहेर पळून जाण्याच्या तयारीत

राधे माँ देशाबाहेर पळून जाण्याच्या तयारीत

निकी गुप्ता या 32 वर्षीय महिलेने राधे माँविरोधात तक्रार केली होती. निकी गुप्ता यांचे सासरचे कुटूंबीय मुंबईतील बोरिवली येथे मिठाईचा व्यवसाय करतात. निकी यांनी माहेरहून अधिक हुंडा आणावा यासाठी राधे माँच्या सांगण्यावरून गुप्ता कुटुंबीयांनी छळ केल्याचा आरोप निक्की गुप्ताने केला होता.

हुंडाप्रतिबंधक कायद्याअंतर्गत तक्रार दाखल झाल्याने मागील काही दिवसांपासून वादग्रस्त ठरलेली स्वंयघोषित धर्मगुरु राधे माँ ही आता पलायन करून परदेशात जाण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. अनेक आरोपांमुळे वादात अडकल्यानंतर राधे माँचा भारतातून पळ काढण्याचा इरादा आहे.

याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करण्यासाठी अद्याप कोणतीही पाउले उचलली नाहीत. दबाव वाढू लागल्याने पोलिस लवकरच कारवाई करण्याची शक्यता आहे. परंतु, पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारण्याआधीच राधे माँ परदेशात पळून जाण्याच्या तयारीत असल्याचं कळतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *