अबू जिंदालचं आर्थर रोड जेलमध्ये उपोषण

अबू जिंदालचं आर्थर रोड जेलमध्ये उपोषण

मुंबईवरील 26/11 हल्ल्यातील दोषी अबु जिंदालने आर्थर रोड जेलमध्ये उपोषणाला सुरुवात केली आहे. आर्थर रोड तुरुंगातील अंडा सेलमधून सामान्य कारागृहात ठेवावं, या मागणीसाठी अबु जिंदालचं उपोषण सुरु आहे.

अबु जिंदालने यासंदर्भात न्यायालयाला पत्र लिहिलं होतं. मात्र त्याच्या पत्राला उत्तर न मिळाल्याने त्याने उपोषणाला सुरुवात केली आहे.

अबु जिंदाल हा 26/11 दहशतवादी हल्ल्याचा आरोपी आहे. अजमल कसाबला ट्रेनिंग दिल्याचा आरोप जिंदालवर आहे. शिवाय औरंगाबादमध्ये 2005 साली मोठ्या प्रमाणावर हत्यारं सापडली होती, त्याचाही आरोप अबू जिंदालवर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *