उधमपूर हल्ल्याप्रकरणी जिवंत पकडण्यात आलेला दहशतवादी मोहंमद नवीद हा पाकिस्तानी नागिरकच असल्याची माहिती उघड झाली आहे. “मीच तो नवीदचा दुर्दैवी बाप आहे,” अशी कबुली मोहंमद याकूब या पाकिस्तानी नागरिकाने कुबली दिली आहे.
मोहम्मद नावेदचे वडिल मोहम्मद याकूब यांनी भारतातील एका इंग्रजी वृत्तपत्राशी दुरध्वनीद्वारे संवाद साधला. या संभाषणात त्यांनी नावेद त्यांचाच मुलगा असल्याची कबुली दिली. नावेदला सोडून द्या, पाकमधील यंत्रणा त्याच्या मागे लागली आहे, त्यांना नावेदला मारायचे आहे अशी भीतीही त्यांनी बोलून दाखवली. मोहम्मद याकूब यांनी पंजाबी भाषेत संवाद साधल्याचे संबंधीत वृत्तपत्राने म्हटले आहे.

भारतीय माध्यमांनी पाकिस्तानचा बुरखा फाडल्याने त्यांचा हा खरा दहशतवादी चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. हिंदुस्तान टाइम्स या इंग्रजी वृत्तपत्राने नवीद याच्या पाकिस्तानातील कुटुंबाशी थेट संपर्क साधल्यावर ही माहिती उघड झाली.
मोहंमद नवीद असे जिवंत पकडण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव असून, तो हल्ल्यानंतर एका काश्मीरमधील एका भारतीय नागरिकाच्या घरात लपला होता. त्या नागरिकाने शिताफीने त्याला पकडले. तत्पूर्वी, नवीद यानेही ‘मी पाकिस्तानी असून, मला येथून काहीही करून बाहेर काढा‘ अशी कबुली दिली होती.
‘तुम्ही भारतातून कॉल करीत आहात. आम्हाला मारून टाकतील. मीच तो दुर्दैवी बाप,‘ असे याकूब यांनी सांगितले. ते बोलताना उदासीन व घाबरलेले होते.
‘लष्कर-ए-तैयबा आमच्या मागावर आहे. नावेद हल्ला केल्यावर त्यामध्ये (भारतात) तो मारला जावा, आणि जिवंत सापडू नये अशी त्यांची इच्छा असेल. कृपया त्याला सोडा,‘ असेही ते म्हणाले.
मुंबईत 2008 मध्ये करण्यात आलेल्या 26-11 च्या दहशतवादी हल्ल्यामागे लष्कर-ए-तैयबा याच दहशतवादी संघटनेचा हात होता.