मामा आणि भाच्याने केली वाहनांची तोडफोड;गुन्हा दाखल

पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री उशिरा आठ वाहनांची अज्ञात टोळक्याने तोडफोड केली आहे. याप्रकरणी काही तासातच सांगवी पोलिसांनी एका आरोपीला जेरबंद केलं आहे. दारूच्या नशेत त्यांनी हे कृत्य केल्याचं सांगितलं असून आरोपी हे मामा भाचे आहेत. आरोपी गणेश खरात अस ताब्यात घेण्यात आलेल्या भाच्याचे नाव असून त्याचा सख्खा मामा आकाश धुडातमल आणि चुलत मामा योगेश हे फरार आहेत. त्यांचा शोध सांगवी पोलीस घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी मध्यरात्री उशिरा सांगवी पोलीस ठाण्याच्या समोरच दुचाकीवरून आलेल्या अज्ञात तिघांच्या टोळक्याने धुडगूस घालत आठ वाहनांची तोडफोड केली. यात टेम्पो आणि इतर वाहनांचा समावेश होता. आरोपी भाचा गणेश खरात, मामा आकाश आणि योगेश हे तिघे रात्री दारूच्या नशेत होते. त्यांनी सांगवी पोलीस ठाण्याच्या समोरच पार्क केलेल्या वाहनांना लक्ष करत सिमेंट ब्लॉक ने आणि दगडाने काचा फोडल्या आहेत. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून त्या आधारे पोलिसांनी आरोपी गणेश ला ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी अधिक तपास सांगवी पोलीस करत असून दोन्ही आरोपींना शोधण्यासाठी पथक रवाना झाले आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *