अभिनेत्री भाग्यश्रीच्या पतीला अटक; पुढील कारावाईदरम्यान…

बॉलिवूडमध्ये ९०च्या दशकात प्रदर्शित झालेला सुपरहिट चित्रपट ‘मैने प्यार किया’मधील सुप्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्रीचे पती हिमालय दासानी यांना अटक करण्यात आली. जुगारात सहभागी असल्याच्या आरोपाखाली त्यांना मंगळवारी आंबोली पोलिसांकडून अटक करण्यात आली. परंतु त्यानंतर हिमालय दासानी यांची जामीनावर सुटका करण्यात आली.

भाग्यश्रीचे पती हिमालय दासानी यांच्यावर लोखंडवाला भागात एक जुगाराचा अड्डा चालवण्याचा आरोप लावण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अनेक लोकांची चौकशी केली आहे.

मुंबई पोलिसांनी गेल्या काही दिवसांपूर्वी अंधेरी भागात छापेमारी केली होती. यावेळी पोलिसांनी जवळपास १५ लोकांना अटक करुन त्यांची चौकशी केली. या चौकशीदरम्यान भाग्यश्रीच्या पतीचे हिमालय दासानी यांचे नाव समोर आले. याप्रकरणी त्यांच्या कुटुंबियांकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.

अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन ‘मैने प्यार किया’ चित्रपटातून प्रसिद्धीझोतात आली. १९९०मध्ये तिने हिमालय दासानी यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. लग्नानंतर मात्र भाग्यश्रीने रुपेरी पडद्याला रामराम ठोकला. भाग्यश्री आणि हिमालय यांना अवंतिका आणि अभिमन्यू ही दोन मुलं आहे. भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यु दासानीने ‘मर्द को दर्द नही होता’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *