पालघर, डहाणूत तुफान पाऊस; केळवे स्थानकात पाणी; ट्रेन सेवा विस्कळीत

पालघर, डहाणू या भागात तुफान पाऊस पडत असल्याने पश्चिम रेल्वे मार्गावच्या अनेक एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. बलसाड-वापी, वापी सुरत, डहाणूरोड ते बोरीवली या आणि अशा ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत. केळवे स्थानकात पाणी साठल्याने आणि पालघर, डहाणू परिसरात तुफान पाऊस झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. दक्षिण गुजरात, पालघर भागात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला त्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. वलसाड फास्ट पॅसेंजर, फ्लाईंग राणी यांच्यासह अनेक ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत. एकूण १३ गाड्या रद्द करण्यात आल्याचे पश्चिम रेल्वेने म्हटले आहे. पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

पालघर, डहाणू या भागात रात्रीपासून पावसाला चांगलीच सुरूवात झाली आहे. अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणीही साठलं आहे. त्याचाच परिणाम रेल्वे सेवेवरही झाला आहे.

दरम्यान पश्चिम रेल्वेने मदत क्रमांकाची यादीही त्यांच्या ट्विटर हँडलवरून ट्विट केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *