नाशिकहून चारधामला जाणाऱ्या बसचा अपघात, 4 जणांचा मृत्यू

मध्य प्रदेशमधील विदिशा जिल्ह्यामध्ये मंगळवारी (11 जून) बसचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नाशिकहून चारधामला जाणाऱ्या बसला अपघात झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास नाशिकहून चारधामला जाणाऱ्या बसचा अपघात झाला आहे. नाशिकहून काही प्रवासी चित्रकूटला जात होते. साधारण बसमध्ये 50 प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे. मध्य प्रदेशमधील विदिशा-सागर रोडवर हा अपघात झाला. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बसमध्ये अडकलेल्या काही प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *