एका रिपोर्टनुसार, गुगल मॅप्सचे हे नवे फीचर टॅक्सी, कॅबमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुरक्षिता लक्षात घेऊन विकसित करण्यात येणार आहे. या फीचरनुसार, तुमची टॅक्सी, कॅबने निर्धारीत केलेल्या मार्गापेक्षा ५०० मीटरपेक्षा अधिक चुकीच्या रस्त्यावरून कॅब जात असल्यास गुगल मॅप्सकडून युजर्सला ताबडतोब अलर्ट मिळणार. शहरातील नवीन प्रवासी, महिला यांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने हे महत्त्वाचे फीचर असणार आहे. बऱ्याचदा शॉर्टकट रस्त्याच्या नावाने प्रवाशांची फसवणूक करण्यात येते. या फीचरमुळे या फसवणुकीलाही आळा घालता येणार आहे.
गुगल मॅप्स भारताशिवाय इतरही देशात हे नवे फीचर लाँच करणार का याची माहिती मिळाली नाही. सध्या गुगलने आपल्या अॅपमध्ये स्पीडोमीटर आणि लोकेशन शो सपोर्टसारखे फीचर आणले आहेत. यासाठी रूट प्रीव्ह्यू, स्पीड कॅमेरा आणि स्पीड लिमिट अलर्टला भारतीय युजर्ससाठी लाँच करणार आहेत.
