एकाच कुटुंबातील चौघे जण कारसहीत वाहून गेले

मुसळधार पावसामुळे यवतमाळमधील नद्या दुथडी भरुन वाहत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील अर्वी – यवतमाळ रोडवर बिल्दोरी पुलावरुन नदीचे पाणी  वाहत होते.  बुधवारी रात्री उशीरा यवतमाळमधील आजणकर कुटुंब त्यांच्या ऑल्टो कारमधून बिल्दोरी पुलावर आले. मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे ऑल्टो कार वाहून गेली. या सर्व गोंधळात आजणकर कुटुंब गाडीतून बाहेर पडू शकले नाहीत व संपूर्ण कुटुंबच पाण्यात वाहून गेले. सध्या पोलिस व अग्निशमन दलाचे जवान या गाडीचा शोध घेत आहेत. गजानन, संजय, गायत्री व सात्वी अशी या चौघांची नावे आहेत.

राज्यात कृत्रिम पावसाचे प्रयत्न सुरु असतानाच विदर्भाला पावसाने अक्षरशः झोडपले आहे. यवतमाळमधील बिल्दोरी पुलावर ऑल्टो कारमधून प्रवास करणारे एकाच कुटुंबातील चौघे जण कारसहीत वाहून गेल्याची घटना बुधवारी रात्री घडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *