शाहरुखला रुग्णालयातून डिस्चार्ज

शाहरुखला रुग्णालयातून डिस्चार्ज

मुंबई – बॉलिवुड सुपरस्टार शाहरुख खानला गुडघ्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.

४९ वर्षीय शाहरुखला डॉक्टरांनी चार दिवस सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असून, गुरुवारी मुंबईच्या ब्रीच कॅंडी रुग्णालयात शाहरुखच्या डाव्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली.

गेल्या अनेक महिन्यांपासून शाहरुख डाव्या गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त होता. त्याच्या गुडघ्याला सूजही आली होती. डॉ. संजय देसाई यांनी शाहरुखच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया केली. त्याच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होत आहे.

दुखापत असूनही शाहरुख राहुल ढोलकियाच्या रईस चित्रपटाचे चित्रीकरण करत होता. सदिच्छांबद्दल शाहरुखने टि्वटरवरुन चाहत्यांचे आभार मानले आहेत. काही दिवस विश्रांती घेऊन शाहरुख लगेचच पुन्हा चित्रीकरणामध्ये व्यस्त होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *