‘त्याने’ विवाहित महिलेला केले ५११ कॉल्स, गुन्हा दाखल

एका डीजेने विवाहीत महिलेला एका दिवसातच ५११ कॉल करून मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना गुजरातच्या वडोदरा शहरात घडली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने तक्रार दाखल केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

एटल पिल्लै नावाच्या डीजेने काही महिन्यांपूर्वी या संबंधित महिलेचा एका क्लबमध्ये नंबर घेतला होता. नंतर त्याने तिला दररोज कॉल करण्यास सुरुवात केली. त्याने तिच्याकडे शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचीही विनंती केली.पण संबंधित महिलेने काहीच प्रतिक्रिया दिली नाही .त्यानंतर त्याने तिच्या घरी जाऊन त्रास देण्यास सुरुवात केली. याबाबत त्या महिलेने तिच्या पतीला सांगितलं. मग त्या तिघांची एक संयुक्त बैठक झाली. या बैठकीत एटल पिलैने त्या महिलेला मारहाण केली आणि दोघांनाही जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतरही त्याच्या धमक्या देणं सुरुच राहिलं. अखेर २३-२४ मार्चला त्याने या महिलेला एकाच दिवसात ५११ कॉल केले. या साऱ्या प्रकाराला कंटाळलेल्या महिलेने पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार दाखल केली. पोलिसांमध्ये तक्रार दाखल झाल्याचे कळताच एटल पिलै फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *