पालघरमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग

जिल्ह्यातील मनोर परिसरातील्या एका केमिकल कंपनीला भीषण आग लागली आहे. सिनर्जी असे या कंपनीचे नाव आहे. मुंबई -अहमदाबाद महामार्गालगत सातीवली गावाजवळ ही कंपनी आहे. दुपारी एकच्या सुमारास कंपनीला आग लागली. ही आग काही वेळातच भडकली. या आगीत रसायनांचा साठा, फायबर आणि प्लास्टिकचे साहित्य जळून खाक झाले. दरम्यान, वाऱ्यामुळे आगीचे लोळ आकाशात उठताना दिसत होते.

आग विझवण्यासाठी पालघर, बोईसर आणि वसई येथून अग्निशमन दलाच्या चार गाड्या दाखल झाल्या आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कंपनीत असलेला रसायनांचा साठा, फायबर आणि प्लास्टिकचे साहित्य आगीच्या भक्षस्थानी पडले आहे. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली असून मनोर पोलीस घटनास्थळी दाखल झालेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *