लिबियामध्ये दहशतवाद्यांच्या गटाने चार भारतीयांचे अपहरण केल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी दिली आहे.
अपहरण करण्यात आलेल्या चार भारतीयांपैकी तीन सिर्ते विद्यापीठात अध्यापनाचे काम करतात तर एक जण विद्यापाठात काम करतात. दोन भारतीय हे हैदराबाद तर इतर दोघे कर्नाटक येथील आहेत.
परराष्ट्र मंत्रालय या भारतीयांच्या कुटुंबियांशी संपर्कात असल्याचे स्वरुप म्हणाले. तसेच याबाबतची अधिक माहिती मिळवण्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रयत्न सुरु असल्याचे स्वरुप यांनी सांगितले.
परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली असून त्यांना याबाबतची माहिती दिली. या अपहरणामागे इसिसचा हात असल्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी जूनमध्ये इराकमधील मोसूल शहरातून इसिसकडून ३९ भारतीयांचे अपहरण करण्यात आले होते. हे सर्व भारतीय सुरक्षित असल्याचा दावा परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे.

