गेवराईत शेतकऱ्याला पोलिसांनी केली बेदम मारहाण

तलवाड़ा तालुक्यातील गेवराई येथे पिक विमा भरताना रांगेत उभा राहला नाही म्हणून शेतकऱ्याला पोलिसांनी बेदम मारहाण केली. दोन पोलिसांनी काठ्यांनी बदडून काढले.

मनोहर अश्रुबा गांधले असे या शेतकऱ्यांचे नाव आहे. तलवाड़ा येथील दोन पोलिसांनी त्याला बेदम मारहाण केली. त्याच्याकडे पाच एकर जमीन आहे तो जिल्हा बँकेच्या तलवाड़ा शाखेत विमा भरण्यासाठी आला होता.

याठिकाणी शेतकऱ्यांची मोठी रांग होती. तेथे गर्दी  असल्याने मनोहर हा शेतकरी रांगेत राहिला नव्हता त्याला पोलिसांनी मारहाण केली. पोलिसांनी अमानुष मारहाण केल्याने तीव्र नाराजी व्यक्त होती आहे. दरम्यान, जिल्हा पोलीस अधिक्षकांनी संबंधित पोलिसांवर कारवाई करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *